मंगळवार, २७ जुलै, २०१०

माणसाने एकदातरी

माणसाने एकदातरी

माणसाने एकदातरी
झाडासारख जगाव.
जमिनीवर पाय रोऊन
आकाशाकडे झेपाव.

माणसाने एकदातरी
झाड होऊन पहाव.
दुस-यांना सावली देऊन
उन्हात उभ रहाव.

माणसाने एकदातरी
चंदन होऊन झिजाव.
दुस-याला शीतलता देऊन
स्वत: सरणात निजावं.

माणसाने एकदातरी
पाषाणासारख व्हावं.
मंदिरातली मूर्ती
कधी पायरीही बनाव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

एक कविता माझी

 एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...