गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

अग मार याच्या कानाखाली कानाखाली कानाखाली ग...

कोलावेरी पासून प्रेरणा घेऊन हे लिहील आहे. तुमचा अभिप्राय, टीका - टिपण्णी, चुका - सुधारणा नक्की कळविणे.

अग मार याच्या कानाखाली कानाखाली कानाखाली ग...

अक्खा दिवस नाक्यावर बसतो,
टवाळक्या हा करतो.
कामधंदा काही नाही
फक्त स्टाईल मारतो.
दारू पितो, सिगारेटी फुंकतो,
लोच्या लफडी करतो.
अग मार याच्या कानाखाली कानाखाली कानाखाली ग...

अभ्यास, नोकरी करण्याऐवजी
उनाडक्या करतो.
येता जाता पोरीबाळींची
छेड हा काढतो.
बारबालांवरती सारे
पैसे उधळतो,
सट्टा, मटका, बेटिंग आणि
जुगार हा खेळतो.
अग मार याच्या कानाखाली कानाखाली कानाखाली ग...

आई बाबा राबराबुनी
याला शिकवितात,
अर्धपोटी स्वत: राहुनी
याचे पोट भरतात.
याच्या उज्ज्वल भविष्याचे
स्वप्न रंगवतात.
मुलगा मात्र त्या स्वप्नांवर
पाणी हे फेरतो.
अग मार याच्या कानाखाली कानाखाली कानाखाली ग...

मंगळवार, ८ मार्च, २०११

अर्थसंकल्प...

अर्थसंकल्प हा सारा
कसा घ्यावा विचारात?
गरिबांनी हो आणावे
कसे सुख संसारात?

महागली वीज बाई
झाले महागडे अन्न.
अर्धपोटी राहुनिया
कसे जगावे प्रसन्न?

दरवाढ औषधाची,
झाला विमाही महाग.
सांगा रित्या या हातांनी
कशी विझवावी आग?

गेल्या सा-या सवलती
लाचखोरांच्या घशात.
जनसामान्यांचे हित
आता साधावे कशात?

असो कोणताही पक्ष
असो कोणताही नेता.
कामाआधी विचारती
चहा पाणी किती देता?

डोळे उघड रे जरा
मतदारा, बळीराजा.
नाही कोणीही कोणाचा
तूच वाली आता तुझा.

एक कविता माझी

 एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...