गुरुवार, १९ मे, २०२२

पावसात चिंब भिजल्यावर  तहान लागते ना,

तसे होते तुला भेटल्यावर.

तुझ्याकडेच पाहत राहावेसे वाटते...

तुझ्या कुशीत मिटल्यावर...!!!

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

स्वामींच्या कृपेने लिखित - स्वामी लिखित

स्वामींच्या कृपेने लिखित - स्वामी लिखित

 

माझ्या स्वामींच्या मायेची

काय सांगू मी महती,

वेदनेच्या उन्हामध्ये

स्वामी वटवृक्ष होती !!

 

माझ्या स्वामींच्या मायेची

काय सांगू मी प्रचिती,

स्वामी नाम मुखी घेता

येई आनंदा भरती !!

 

माझ्या स्वामींच्या मायेची

काय करू मी गणती,

स्वामी अनंत आकाश

स्वामी प्रेमळ धरती !!

एक कविता माझी

 एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...