रात दिन तुझी आस,
सारा तुझाच हा भास.
माझा होऊनिया श्वास
सखे वाहतेस तूच.
तू काळीज, तू स्पंदन,
तूच प्राण, तू जीवन.
माझ्या डोळ्यांतून जग
सखे पाहतेस तूच.
तू या अधरांचे स्मित,
जन्मोजन्मीची तू मित.
माझ्या वेदनाही सा-या
सखे साहतेस तूच.
तूच सोशिक धरणी
पूज्य जगत-जननी.
माझ्या मनीच्या राउळी
सखे राहतेस तूच.
मंगळवार, २० जुलै, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
एक कविता माझी
एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...
-
प्रियकराची हजार लफडी प्रेयसीचे हजार नखरे म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे. तो म्हणतो मी चुकलोच नाही ती म्हणते फक्त माझेच खरे. ...
-
सुगंधाने चिंब केले माझे मन जिने तो पारीजाताचा दरवळ तू आहेस. दृष्टिहीन डोळ्यांना सुख स्वप्न दिले जिने ती रातराणी तू आहेस. निवडुंगाच्या काटयां...
-
कितीक प्रमाद घडले माझे मार्ग दाखवी खरा. आलो शरण तुला ईश्वरा... तुझी कृपा नर जन्मी घातले, सुख दु:खाचे दिवस दाविले. क्रुतघ्न मी पण तुला विस्मर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा