गुरुवार, २४ सप्टेंबर, २००९

मन अल्लाद पाखरू...

मन अल्लाद पाखरू...

मन अल्लाद पाखरू
असे होउनिया जाते.
बघ तुझ्या कुशीमधे
कसे सामाउनी जाते.

मन अल्लाद पाखरू
घेई स्वच्छंद भरारी.
परी फिरुनिया मागे
येई तुझ्याच शिवारी.

मन अल्लाद पाखरू
कधी होई वेडेपिसे.
तुझ्या सयीविना त्यास
ध्यास दूसरा ग नसे.

मन अल्लाद पाखरू
भासे कधी छळवाद.
कधी स्पर्श हा रेशमी,
कधी मूक तो संवाद.

एक कविता माझी

 एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...