माणुस...
माणुस मरता मारुन जातो
मागे काही उरत नाही.
अन् तरीही आठवणींची
गर्दी काही सरत नाही.
जन्म जातो देण्या-घेण्यात
विषय वासनेची ओझी नेण्यात.
किती घेतले, किती दिले हे
काही केल्या स्मरत नाही.
नाती, गोती तुटतात सगळी,
स्वप्ने कितीएक राहती अधुरी.
ही स्वप्नांची भग्न मंदिरे
मिटल्या डोळ्यांतही विरत नाही.
ही साद असे शेवटची माझी,
नको मनात ठेऊ राग काही.
ओठांवरील वेदना दडपली
पण नयनी अश्रू ठरत नाही.
मंगळवार, १३ ऑक्टोबर, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
एक कविता माझी
एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...
-
प्रियकराची हजार लफडी प्रेयसीचे हजार नखरे म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे. तो म्हणतो मी चुकलोच नाही ती म्हणते फक्त माझेच खरे. ...
-
सुगंधाने चिंब केले माझे मन जिने तो पारीजाताचा दरवळ तू आहेस. दृष्टिहीन डोळ्यांना सुख स्वप्न दिले जिने ती रातराणी तू आहेस. निवडुंगाच्या काटयां...
-
कितीक प्रमाद घडले माझे मार्ग दाखवी खरा. आलो शरण तुला ईश्वरा... तुझी कृपा नर जन्मी घातले, सुख दु:खाचे दिवस दाविले. क्रुतघ्न मी पण तुला विस्मर...
1 टिप्पणी:
Manus...!!! kharach kitti chhan imagination ahe.
टिप्पणी पोस्ट करा