तुझ्याचसाठी...
हा चंद्र, हे तारे.
तुझ्या स्वप्नाने भारलेले
आकाश सारे.
तव प्रीतीच्या सुगंधात
न्हालेले वारे...
तुझ्याचसाठी आहेत सारे.!
सप्तरंग हे इंद्रधनूचे,
सुंदर जग हे मनुचे,
म्रुण्मयी हे सागर किनारे...
तुझ्याचसाठी आहेत सारे.!
निसर्गाचे औदार्य,
सुमनांचे सौंदर्य,
तव स्पर्शाने कलिकांवर
उमलणारे शहारे...
तुझ्याचसाठी आहेत सारे.!
गुरुवार, १३ ऑगस्ट, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
एक कविता माझी
एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...
-
प्रियकराची हजार लफडी प्रेयसीचे हजार नखरे म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे. तो म्हणतो मी चुकलोच नाही ती म्हणते फक्त माझेच खरे. ...
-
सुगंधाने चिंब केले माझे मन जिने तो पारीजाताचा दरवळ तू आहेस. दृष्टिहीन डोळ्यांना सुख स्वप्न दिले जिने ती रातराणी तू आहेस. निवडुंगाच्या काटयां...
-
कितीक प्रमाद घडले माझे मार्ग दाखवी खरा. आलो शरण तुला ईश्वरा... तुझी कृपा नर जन्मी घातले, सुख दु:खाचे दिवस दाविले. क्रुतघ्न मी पण तुला विस्मर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा