शिर्डी मध्येच शोधतो
दिन होऊनी साईला
कोणी सांगाल का मज
साई माझा कोठे गेला.
सा-या रेटारेटीतून
आलो साईच्या चरणी.
झाले काळजाचे पाणी
स्पर्शीताच ती समाधी.
काय अघटीत झाले,
का हे डोळे पाणावले?
जाणवले ना अस्तित्व
का रे तुझे गाभा-यात?
का रे रिताच भासला
तुझा दरबार मला?
मन राहियले रिते,
गाभाराही रिता झाला?
तुझ्या दर्शनास साई
धावतो मी दिशा दाही.
टाहो फोडते लेकरू
पान्हा तुला येत नाही.
सारा बाजार पाहुनी
जीव कासावीस झाला.
गर्दी गोंधळात येथे
माझा साई हरवला… गर्दी गोंधळात येथे माझा साई हरवला.
दिन होऊनी साईला
कोणी सांगाल का मज
साई माझा कोठे गेला.
सा-या रेटारेटीतून
आलो साईच्या चरणी.
झाले काळजाचे पाणी
स्पर्शीताच ती समाधी.
काय अघटीत झाले,
का हे डोळे पाणावले?
जाणवले ना अस्तित्व
का रे तुझे गाभा-यात?
का रे रिताच भासला
तुझा दरबार मला?
मन राहियले रिते,
गाभाराही रिता झाला?
तुझ्या दर्शनास साई
धावतो मी दिशा दाही.
टाहो फोडते लेकरू
पान्हा तुला येत नाही.
सारा बाजार पाहुनी
जीव कासावीस झाला.
गर्दी गोंधळात येथे
माझा साई हरवला… गर्दी गोंधळात येथे माझा साई हरवला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा